‘माल’ संबोधल्याने शायना एनसी यांचा राग अनावर, शिवसेना उबाठाच्या खासदारासह नेतृत्वाला धरलं धारेवर

“बाहेरचा माल चालणार नाही. मुंबादेवीमध्ये इथलाच माल चालणार, अमिन पटेल” असं अरविंद सावतं म्हणाले. या टीकेवरून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला. बघा काय केला हल्लाबोल?

'माल' संबोधल्याने शायना एनसी यांचा राग अनावर, शिवसेना उबाठाच्या खासदारासह नेतृत्वाला धरलं धारेवर
| Updated on: Nov 01, 2024 | 12:08 PM

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार शायना एनसी यांनी आज शिवतीर्थवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या भेटीसंदर्भात त्यांना सवाल सवाल केला असताना त्या म्हणाल्या, आमचे कौटुंबिक संबध आहेत. कोणत्याही राजकीय चर्चा आमच्यात झाल्या नाहीत. राज ठाकरेंना भेटल्यानंतर त्यांनी माडियाशी संवाद साधला. दरम्यान, यावेळी “बाहेरचा माल चालणार नाही. मुंबादेवीमध्ये इथलाच माल चालणार, अमिन पटेल” असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्यावर टीका केली होती. शायना एनसी यांनी पत्रकारांना एक क्लिप ऐकवली आणि अरविंद सावंत यांच्यावर टीका करत संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. ‘राजकारणात सक्षम असलेल्या महिलेला माल संबोधलं जातंय यावरून अरविंद सावंत आणि त्यांच्या पक्षाची मानसिकता लक्षात येत आहे. म्हणजे मुंबादेवी येथील प्रत्येक महिला ही माल आहे?’ असा आक्रमक सवालही त्यांनी उबाठाला केला. ज्यांच्यासाठी आम्ही निवडणुकीला प्रचार केला. मोदींच्या नावावर निवडून आले. त्यांची सुरूवात तेथून झाली आणि आज ते मला माल संबोधतात यावरून त्यांची मनस्थिती लक्षात येतेय. यावरून त्यांनी शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केलाय.

Follow us
महायुतीचं सरकार येणार अन् मोठं पद मिळणार, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
महायुतीचं सरकार येणार अन् मोठं पद मिळणार, अजितदादा नेमकं काय म्हणाले?.
माल संबोधल्याने एनसी यांचा राग अनावर, उबाठाच्या खासदाराला धरलं धारेवर
माल संबोधल्याने एनसी यांचा राग अनावर, उबाठाच्या खासदाराला धरलं धारेवर.
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार.
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे.
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं.
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.