'तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल ये है की...', शेरो शायरीतून भाजपच्या बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

‘तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल ये है की…’, शेरो शायरीतून भाजपच्या बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Jan 12, 2025 | 4:31 PM

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आधुनिक हिंदी साहित्यातील भारतीय कवी दुष्यंत कुमार यांच्या काही ओळी म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

भाजप नेते आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आधुनिक हिंदी साहित्यातील भारतीय कवी दुष्यंत कुमार यांच्या काही ओळी म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. आशिष शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरेची मी तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला सांगतोय. तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं… कमाल ये है की फिर भी तुम्हें यक़ीन नहीं..तेरी ज़ुबान है झूठी ज्म्हूरियत की तरह तू एक ज़लील-सी गाली से बेहतरीन नहीं ”, अशा शेरोशायरीतून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं या विजयानंतर आज शिर्डीत भाजपाचं प्रदेश महाविजय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील भाजपाचे सर्व नेते दिग्गज तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह हे देखील हजर झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं आज होत असलेलं हे अधिवेशन महत्वाचं मानलं जात आहे. या अधिवेशनात बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर भाष्य करत टीका केली आहे.

Published on: Jan 12, 2025 04:31 PM