Narayan Rane Video : ‘त्याला सांगा हे बरं नाही, तो जिथं जातो तिथं…’, त्यावेळी राणेंनी ठाकरेंना काय दिला होता सल्ला?
दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याने पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या याचिकेत आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. यासंदर्भात राणेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय.
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकीय नेत्यांमध्ये दिशा सालियन प्रकऱणावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसताय. अशातच भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी दोन फोन केले असल्याचा दावाही केला. राणे पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘ही घटना घडली तेव्हा मी मुंबईवरून घरी चाललो होतो. तेवढ्यात वांद्रे क्रॉस केल्यावर फोन आला. मिलिंद नार्वेकरचा. म्हणाले, दादा साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. त्यांनी फोन घेतल्यावर मी म्हटलं जय महाराष्ट्र साहेब, बोला… उद्धव ठाकरे म्हणाले, नाही साहेब मला हे बोलायचंय तुम्हाला मुलं आहेत. मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काही प्रेसला बोलता. आदित्यचं नाव घेता. माझी विनंती आहे की तुम्ही त्याचा उल्लेख करू नये. पुढे ते असेही म्हणाले, ‘उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा. एक तर मी अमूक ठिकाणी, अमूक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाही. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली. आरोपींना अटक झाली पाहिजे हे म्हणतोय. त्यात तडजोड नाही. फक्त तुम्ही तुमच्या मुलाचं नाव घेतलं, त्याला संध्याकाळी जिथे जातो, तिथं जाण्यापासून सांभाळा. सांगा त्याला हे बरं नाही. माझ्या घराच्या समोर तो डिनो मोरिया राहतो. तिथे हे लोक जमतात आणि काय साडे तीन चार तास धुमाकूळ घालतात. पण तुम्हाला सांगणार नाही. म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा’, असं नारायण राणे म्हणाले.