पक्षाविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या वरुण गांधी, मनेका गांधींना डच्चू

पक्षाविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या वरुण गांधी, मनेका गांधींना डच्चू

| Updated on: Oct 07, 2021 | 2:48 PM

जेपी नड्डा यांनी आज भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 80 जणांची ही जम्बो कार्यकारिणी आहे. या कार्यकारिणीतून भाजपविरोधात रणशिंग फुंगकणारे युवा नेते वरुण गांधी यांना डच्चू देण्यात आला आहे.

जेपी नड्डा यांनी आज भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 80 जणांची ही जम्बो कार्यकारिणी आहे. या कार्यकारिणीतून भाजपविरोधात रणशिंग फुंगकणारे युवा नेते वरुण गांधी यांना डच्चू देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या कार्यकारिणीतून मनेका गांधी यांनाही वगळण्यात आलं आहे. नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, पीयूष गोयल आदींचा समावेश कायम आहे. तर, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत 50 विशेष आमंत्रित आणि 179 स्थायी सदस्य असणार आहेत. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय मोर्चांचे अध्यक्ष, प्रदेश प्रत्रारी, सह प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे.