विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत नेमका प्लॅन काय?

स्थानिक गटबाजी, तुल्यबळ उमेदवार आणि काही जागांवरचा वाद मिटवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत नव्या वादाची चर्चा आहे. तो फॉर्म्युला म्हणजे उमेदवार एका पक्षाचा असला तरी चिन्ह दुसऱ्या पक्षाचं असेल.

विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत नेमका प्लॅन काय?
| Updated on: Oct 20, 2024 | 10:18 AM

उमेदवार भाजपचा पण चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचं, उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि चिन्ह भाजपच्या कमळाचं, उमेदवार शरद पवारांचा तर चिन्ह ठाकरेंच्या मशालीचं, उमेदवार उद्धव ठाकरेंचा पण चिन्ह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं म्हणजेच तुतारीचं… असं चित्र येत्या विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात दिसण्याची शक्यता आहे. एकमेकांची मत ट्रान्सफर व्हावी, सक्षम उमेदवार मिळावा आणि जागा न सुटल्याने युती आघाडीमध्ये निर्माण होणारा तणाव निवळावा म्हणून नव-नव्या शकली लढवल्या जाता आहेत. नाराजी दूर होऊन ग्राऊंड लेव्हलवर कार्यकर्त्यांनी एकजूटीनं राहावं म्हणून विधानसभेला माणूस आमचा, निशाण तुमचं? या जुगाडाची चाचपणी सुरू आहे. सांगलीच्या इस्लामपुरात शरद पवार गटाचे जयंत पाटील आमदार आहेत. पंरपरेने ही जागा राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी आहे. अखंड राष्ट्रवादीचा येथे होल्ड असला तरी जयंत पाटील शरद पवार गटात असल्याने अजित पवार गटाकडे येथे तुल्यबळ उमेदवार नाही. तर भाजप जागा लढवत असली तरी तुल्यबळ इतकं संघटन नाही. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपच्या निशिकांत पाटलांना तिकीट मिळणार आहे. पण ते अजित पवार यांच्या घड्याळ या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे.

Follow us
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन.
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु.
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले.
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?.
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान.
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध.
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील.
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.