…तर मुंबईत हिंदुंचं जगणं कठीण होईल, हिंदू जन आक्रोश मोर्च्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया
आमच्या विरोधात येणाऱ्यांविरोधात आम्ही लढू शकतो हे सांगण्याची गरज आहे. त्यासाठी हा मोर्चा निघणं हा ऐतिहासिक क्षण, असल्याचे नितेश राणेंनी म्हटले आहे.
लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, धर्मांतर विरोधी कायदा लागू करा आणि श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा द्या या मागणीसाठी मुंबईत हिंदू समाजाने आज मुंबईत विराट मोर्च्याचे आयोजन केले आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील हिंदू आता जागृत होत आहे आणि ही काळाची गरज आहे. हिंदूंनी एकत्र येऊन संदेश देणं महत्त्वाचं आहे. गेले अडीच वर्ष हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न झाला, हिंदूंची संख्या कशी कमी होईल मग ते लव्ह जिहाद आणि लँड जिहादमुळे असंख्य हिंदूंना त्यांच्या घरातून पलायन करण्याची वेळ आली. त्यामुळे याला एकच उत्तर आहे ते म्हणजे हिंदूंनी एकत्र येणं, असे नितेश राणे म्हणाले.
आमच्या विरोधात येणाऱ्यांविरोधात आम्ही लढू शकतो हे सांगण्याची गरज आहे. त्यासाठी हा मोर्चा निघणं हा ऐतिहासिक क्षण आहे, असं नितेश राणे यांनी सांगितलं. आमच्या माता भगिनींचं लव्ह जिहादमधून आयुष्य खराब करण्यात आलं. लँड जिहादद्वारे वर्चस्व निर्माण केलं तर आम्ही खपवून घेणार नाही. हे सांगणं गरजेचं होतं. महाविकास आघाडीनेही त्यांच्या काळात हिंदूंच्या सणासुदींवरही टाच आणली होती. या सर्व गोष्टींना या मोर्च्यातून उत्तर मिळेल. हिंदूंच्या आडवे कोणी येणार नाही, असं राणे म्हणाले.