विद्या चव्हाण यांनी केलेल्या चित्रा वाघ यांच्यावरच्या आरोपांवर भाजपचं ‘नो कॉमेंट्स’
विद्या चव्हाणांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने चित्रा वाघ यांनी सुनेला फूस लावल्याचा आरोप केलाय. त्यासाठी सूनेला काय काय सांगितलं. याच्या संभाषणाची क्लिपच चित्रा वाघ यांनी भर पत्रकार परिषदेत ऐकवली. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून सून आणि मुलाच्या घटस्फोटाच्या प्रकणात नाक खुपसून मला बदनाम केल्याचा आरोप त्यांनी केला.
विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर जे आरोप केलेत. त्यावर प्रतिक्रिया देण्यास भाजपने नकार दिलाय. दुसरीकडे अजित पवार गटाच्या रूपाली पाटील यांनी चित्रा वाघ यांना घरचा आहेर देत कुटुंबाला राजकारणात न घेचण्याचा सल्ला दिला. एखाद्या खटल्यात सनदशीर मार्गाऐवजी पडद्याआडून ज्याला राजकीय रंग दिला गेला का? असा सवाल केला असताना भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. विद्या चव्हाणांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने चित्रा वाघ यांनी सुनेला फूस लावल्याचा आरोप केलाय. त्यासाठी सूनेला काय काय सांगितलं. याच्या संभाषणाची क्लिपच चित्रा वाघ यांनी भर पत्रकार परिषदेत ऐकवली. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून सून आणि मुलाच्या घटस्फोटाच्या प्रकणात नाक खुपसून मला बदनाम केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. तर सुनेला कशाप्रकारे व्हिडीओ तयार करायचे याचं षडयंत्र रचल्याचे सांगून सून, चित्रा वाघ आणि एका डॉक्टरांमधील संभाषणच चव्हाणांनी समोर आणलं. या आरोपानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला.