मुंबईत नेत्यांची एकजूट, ग्राऊंडवर मात्र ताटातूट? अजितदादांना भाजपनेच दाखवले काळे झेंडे, पण का?

मुंबईत नेत्यांची एकजूट, ग्राऊंडवर मात्र ताटातूट? अजितदादांना भाजपनेच दाखवले काळे झेंडे, पण का?

| Updated on: Aug 19, 2024 | 12:10 PM

अजित पवार यांनी जुन्नरमध्ये भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवल्याचे पाहायला मिळाले. तर एकेरी भाषेत टीका करत राष्ट्रवादीला महायुतीला बाहेर पडण्याचंही आव्हान केलं. नेमका वाद का आणि कशावरून झालाय? यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काय म्हटलंय बघा?

महायुतीचे नेते एकजुटीचे आश्वासनं देत असली तरी ग्राऊंडवर मात्र अजित पवार यांच्याविरोधातील भाजपचा आक्रोश वारंवार बाहेर पडत आहे. जुन्नरमध्ये भाजप पदाधिकारी आशा बुचकेंसह इतरांनी अजित पवार हाय-हायच्या घोषणा देत त्यांच्यावर दुजाभावाचा आरोप केला आहे. पर्यटन विभागाच्या बैठकीत अजित पवार यांनी फक्त त्यांचेच आमदार अतुल बेनके यांनाच बोलावून भाजप-शिंदेगटाला आंधारात ठेवल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांचा आहे. त्याविरोधातच अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या वेळी भाजपकडून अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. सरकार तुमचेच आहेत आणि महायुतीतील तीनही घटक तुमचेच असूनही तुमच्यावर आंदोलनाची वेळ का आली? असा सवाल आशा बुचके यांना केला असताना त्यांनी पत्रकारांनाच उलट सवाल केलेत. प्रश्नाला उत्तर करण्याऐवजी भाजप पदाधिकारी मात्र पत्रकारांवरच भडकल्या.. बघा व्हिडीओ

Published on: Aug 19, 2024 12:10 PM