देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात का दिसत नाही?; पंकजा मुंडे यांनी दिलं उत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या ठिकाणी पंकजा मुंडे नसतात, त्यामुळे राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या चर्चांवर भाष्य करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या ठिकाणी पंकजा मुंडे नसतात, त्यामुळे राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या चर्चांवर भाष्य करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. पकंजा मुंडे यांनी पहिल्यांदाच यावर उत्तर दिले असून त्या म्हणाल्या माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. त्यामुळे नाराजीच्या किंवा माझ्या मनात खदखद आहे अशा बातम्या लावण्याचं कारण नाही. फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमाला मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी तेथे गेले नाही. मी भाजपच्या संस्कारात वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते. पण कोणत्याही सार्वजनिक आणि पक्षाबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला गरजेचं नाही, असं त्या म्हणाल्या.
तर फडणवीस असलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसत नाही, अशा रंगलेल्या चर्चांवरील कारण त्यांना विचारले असता त्या मिश्किलपणे म्हणाल्या, मीही ती चर्चा ऐकली आहे. यावर वेगळी पत्रकार परिषद घेईल.