पंकजा मुंडे यांचं राजकीय ‘चेक’मेट? साखर कारखाना अडचणीत अन् आले मदतीचे धनादेश
VIDEO | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा कारखाना अडचणीत सापडला आहे. १९ कोटींचा कर चुकवल्याप्रकरणी पंकजा मुंडेंच्य वैद्यनाथ कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांचे समर्थक पुढं सरसावले केली कोट्यवधी रुपयांची मदत त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या आर्थिक अडचणीतल्या कारखान्यावर जीएसटी विभागाच्या कारवाई झाली. कारखाना आर्थिक अडचणीत सापडल्याची खंत पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आणि आता त्यानंतर मदत म्हणून पंकजा मुंडे समर्थकांनी कोट्यवधी रुपये जमवले आहेत. पंकजा मुंडेंनी कारखान्याची अडचण मांडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मदतीचा ओघ सुरु केलाय. लाखो रुपयांच्या मदतीचे चेक पंकजा मुंडेंचे समर्थक सोशल मीडियावर शेअर करतायत. १९ कोटीचं काय तर १९ हजार कोटी थोबाड्यावर मारुन फेकू, या आशयाची पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर ‘मदत नव्हे कर्तव्य’ या टॅगलाईननं पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्यासाठी मदत सुरु झाली. माहितीनुसार दुपारपर्यंत ५ कोटींहून जास्तीची रक्कम पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी जमवल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, १९ कोटींचा कर चुकवल्याप्रकरणी पंकजा मुंडेंच्य वैद्यनाथ कारखान्यावर कारवाई झाली. केंद्र सरकारच्या जीएसटी विभागानं ही कारवाई केली. मात्र केंद्राकडून आर्थिक अडचणीतल्या अनेक कारखान्यांना मदत झाली. पण त्यातून माझ्या कारखान्याचा प्रस्ताव वगळला गेल्याची खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली होती. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट