भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर सडकून टीका

भटकती आत्मा… लोकसभेचा प्रचार तापला, पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर सडकून टीका

| Updated on: May 01, 2024 | 10:26 AM

निवडणुकीचा प्रचार सध्या मोदी विरूद्ध पवार असा रंगताना दिसतोय. दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण सहा सभा घेतल्या. या सभांमधून सर्वाधिक वेळा मोदींनी शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. मोदींनी भटकती आत्मा अशी टीका केल्यानंतर प्रचार चांगलाच तापल्याचे दिसतंय.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या मोदी विरूद्ध पवार असा रंगताना दिसतोय. दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण सहा सभा घेतल्या. या सभांमधून सर्वाधिक वेळा मोदींनी शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. मोदींनी भटकती आत्मा अशी टीका केल्यानंतर प्रचार चांगलाच तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रचारात मोदींच्या एका वक्तव्यावरून भटकती आत्म्यावरून राजकारण तापलंय. पुण्यातील प्रचारसभेतून मोदींनी भटकती आत्मा असे म्हणत शरद पवार यांचं नाव घेतला असा उल्लेख केला. इच्छा पूर्ती न झालेली भटकती आत्मा इतरांचाही खेळ बिघडवते. पुलोदच्या सरकारचा दाखला देत मोदींनी शरद पवारांवर अस्थिरतेचा खेळ सुरू केल्याचा आरोप केला. मोदींनी केलेल्या याच टीकेला स्वतः शरद पवारांनी प्रत्तुत्तर दिलंय. लोकांचे दुःख बघून माझा आत्मा तडफडतो पण मी लाचार नाही. कोणाचे पक्ष फोडले नाही की घरातील माणसं फोडली नाही, असे शरद पवार म्हणाले.

Published on: May 01, 2024 10:26 AM