समीर वानखेडेंकडून संजय राऊत यांना दिवाळी शुभेच्छा, आधी टीका-आरोप अन् आता भेटीगाठी, भाजपचा घणाघात काय?
सतत वादात राहणारे समीर वानखेडे आणि खासदार संजय राऊत यांची काल भेट झाली. या भेटीमध्ये दोघांचा हसत संवाद देखील झाला. मात्र या भेटीवर भाजपने वानखेडे आणि राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. समीर वानखेडे आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण, भेटीवरून भाजपचा खोचक टोला काय?
मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३ | सतत वादात राहणारे समीर वानखेडे आणि खासदार संजय राऊत यांची काल भेट झाली. या भेटीमध्ये दोघांचा हसत हसत संवाद देखील झाला. मात्र या भेटीवर भाजपने वानखेडे आणि राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. भांडूपमधील एका कार्यक्रमात वानखेडे आणि राऊत यांची भेट झाली. यावेळी वानखेडे यांनी राऊत यांच्या घरी जात त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी सुनील राऊत देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या भेटीत राऊतांनी त्यांचं हसून स्वागत केलं. यावेळी त्यांनी हस्तांदोलन करत त्यांच्या पाठीवरही हात ठेवल्याचे पाहायला मिळाले. या भेटीवरच भाजपच्या प्रवीण दरेकर यांच्याकडून जोरदार निशाणा साधलाय.