अमोल मिटकरींचा जीव किती? कुवत काय?, 'त्या' इशाऱ्यानंतर भाजपच्या प्रवीण दरेकरांचं थेट उत्तर

अमोल मिटकरींचा जीव किती? कुवत काय?, ‘त्या’ इशाऱ्यानंतर भाजपच्या प्रवीण दरेकरांचं थेट उत्तर

| Updated on: Jun 20, 2024 | 11:00 AM

अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये आणि प्रवक्त्यांमध्ये सुसंवाद नाही का? अशी शंका उपस्थित करणाऱ्या काही भूमिका गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्यात. अजित पवार यांच्या कुणीही टीका केली तर अंगावर आल्यास शिंगावर घेणारे दोन प्रवक्ते सुरज चव्हाण आणि अमोल मिटकरी हे जशाच तसं उत्तर देताय.

भाजप जर त्यांच्या पराभवाचं खापर अजित पवार यांच्यावर फोडत असेल तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी भाजपला दिला होता. यानंतर प्रविण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सुनील तटकरे यांनी सावधपणे प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये आणि प्रवक्त्यांमध्ये सुसंवाद नाही का? अशी शंका उपस्थित करणाऱ्या काही भूमिका गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्यात. अजित पवार यांच्या कुणीही टीका केली तर अंगावर आल्यास शिंगावर घेणारे दोन प्रवक्ते सुरज चव्हाण आणि अमोल मिटकरी हे जशाच तसं उत्तर देताय. तर यानंतर महायुतीत विसंवाद नल्याचे सांगत बचावात्मक भूमिका आणि सावधपणे भूमिका घेणारे दोन खासदार म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे… बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 20, 2024 10:59 AM