भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस मल्लिकार्जुन खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या तक्रारीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाकडून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून, तक्रारीबाबत उत्तर देण्याच्या दोघांना आयोगाच्या सूचना करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीला अगदी बोटावर मोडण्याऐवढे दिवस शिल्लक असतना भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना निवडणूक आयोगाकडून एक नोटीस पाठवण्यात आली आहे. ही नोटीस शनिवारी बजावण्यात आली. भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या तक्रारीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाकडून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून, तक्रारीबाबत उत्तर देण्याच्या दोघांना आयोगाच्या सूचना करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या परस्परविरोधी तक्रारींवर दोन्ही पक्षांनी सोमवारी दुपारी १ पर्यंत उत्तर द्यावे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकी दरम्यान दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहेत. सध्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, दोन्ही राज्यात या राजकीय पक्षाचे नेते विरोधकांवर टीका करत आहेत. अशावेळी काही आक्षेपार्ह वक्तव्यंही केली जात असताना यावरून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. यावर निवडणूक आयोगाने आता दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना नोटीस बजावून उत्तर मागवले आहे.