कसब्यासाठी भाजपकडून केंद्रीय निवड समितीला ५ नावांचा प्रस्ताव, यासह जाणून घ्या दिवसभरातील घडामोडी
कसबा पोट निवडणुकीसाठी भाजपकडून केंद्रीय निवड समितीला ५ नावांचा प्रस्ताव देण्यात आला असून यामध्ये शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांच्या नावांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. पदवीधर आणि शिक्षक निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा जाहीर करणार का? याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी पत्र […]
कसबा पोट निवडणुकीसाठी भाजपकडून केंद्रीय निवड समितीला ५ नावांचा प्रस्ताव देण्यात आला असून यामध्ये शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांच्या नावांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.
पदवीधर आणि शिक्षक निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा जाहीर करणार का? याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी पत्र पाठवणार, कसबा आणि चिंचवडबाबत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले असून मोठ्या भेटीगाठीही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील कसबा पेठ पोट निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांना आज दुपारपर्यंत अर्ज पाठवण्याच्या सूचना असून मुलाखतीनंतर उमेदवार ठरण्यात येणार आहे. तर सी व्होटर्सच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला लोकसभेत ३४ जागा मिळणार असल्याचे समोर आले असून सी व्होटर्सच्या सर्वेवरून ठाकरे आणि शिंदे गटात एकच खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या मोठ्या घडामोडी