महाराजा रणजीत सिंग यांचा पुतळा विटंबना, दिल्लीत पाकिस्तान दुतावासाबाहेर भाजप आक्रमक
लाहोरमध्ये महाराजा रणजीत सिंग यांचा पुतळा आक्रमक कट्टरपंथियांना तोडला आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये कट्टरपंथियांनी ही कृती केली. पुतळा तोडल्याप्रकरणी एका अटक करण्यात आलीय.
लाहोरमध्ये महाराजा रणजीत सिंग यांचा पुतळा आक्रमक कट्टरपंथियांना तोडला आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये कट्टरपंथियांनी ही कृती केली. पुतळा तोडल्याप्रकरणी एका अटक करण्यात आलीय. अफगाणिस्तानात तालिबान आक्रमक झालं आहे. तर, लाहोरमध्ये कट्टरपंथिय आक्रमक झाल्याचं दिसून आलेय. या घटनेचे तीव्र प्रतिसाद उमटले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिल्लीत पाकिस्तान दुतावासाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. दिल्लीत भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्य़ा प्रमाणात घोषणाबाजी केली. पाकिस्तान दुतावासाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत घडेलल्या घटनेचा तीव्र निषेध केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं देखील पाकिस्तानात काल घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केला होता.
Latest Videos