Get Well Soon… उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’बाहेर कुणी केली बॅनरबाजी?
मुंबईतील मातोश्री समोरील कलानगर सिग्नलवर Get Well Soon अशा आशयाचे बॅनर दिसताय. उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बाहेर हे Get Well Soon चे बॅनर झळकल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. कुणी लावले बॅनर्स?
मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ : मुंबईतील कलानगर भागात पुन्हा एकदा बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. मुंबईतील मातोश्री समोरील कलानगर सिग्नलवर Get Well Soon अशा आशयाचे बॅनर दिसताय. उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बाहेर हे Get Well Soon चे बॅनर झळकल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना गेट वेल सून असे म्हणत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर उद्धव ठाकरे यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांचा गंभीर असलेला चेहरा या बॅनरवर दिसतोय. तर शिवानी दानी वाखरे यांनी हा बॅनर लावला शिवानी वाखरे या भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भाजपकडून डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.