सासरे विरुद्ध सूनेत रंगणार लढत? रावेर लोकसभेचं काय आहे समीकरण?

सासरे विरुद्ध सूनेत रंगणार लढत? रावेर लोकसभेचं काय आहे समीकरण?

| Updated on: Feb 17, 2024 | 12:37 PM

जळगाव लोकसभेत महाविकास आघाडीकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारीची चिन्ह आहेत. मात्र तसं घडलं तर समोरून भाजपने रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली तर रावेर लोकसभेमध्ये सासरे विरुद्ध सूनेमध्ये लढत रंगताना दिसणार आहे

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : रावेर लोकसभेमध्ये सासरे विरुद्ध सूनेमध्ये लढत रंगण्याची शक्यता आहे. रावेर लोकसभा शरद पवार गटाला मिळाल्यास लढण्यास तयार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. जळगाव लोकसभेत महाविकास आघाडीकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारीची चिन्ह आहेत. मात्र तसं घडलं तर समोरून भाजपने रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली तर रावेर लोकसभेमध्ये सासरे विरुद्ध सूनेमध्ये लढत रंगताना दिसणार आहे. २०१९ मध्ये रावेर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रक्षा खडसे यांना ६ लाख ५५ हजार ३८६ मतं मिळाली होती. तर त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या काँग्रेसच्या उल्हास पाटील यांना ३ लाख १९ हजार ५०४ मतं मिळाली होती. यावेळी रक्षा खडसे यांचा दणदणीत विजय झाला होता. मात्र त्यावेळी एकनाथ खडसे हे भाजपमध्ये होते. तर चोपडा, मुक्ताईनगर, रावेर मलकापूर आणि भूसावळ येथे एकनाथ खडसे यांना मानणारा मोठा वर्गही आहे. त्यामुळे आता यंदा एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे हे आमने-सामने असतील तर निवडणूक अधिक चुरशीची होऊ शकते.

Published on: Feb 17, 2024 12:35 PM