Kambal Wale Baba आहे तरी कोण? विरोधकांकडून भाजपचे राम कदम लक्ष्य अन् काय केले गंभीर आरोप? बघा स्पेशल रिपोर्ट

Kambal Wale Baba आहे तरी कोण? विरोधकांकडून भाजपचे राम कदम लक्ष्य अन् काय केले गंभीर आरोप? बघा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Sep 16, 2023 | 8:28 AM

tv9 Special Report | कंबलवाला बाबा या नावानं प्रसिद्ध असलेल्या बाबानं घाटकोपरमध्ये हजारो रुग्णांवर उपचार केले, या बाबावरुन भाजप आमदार राम कदम विरोधकांच्या निशाण्यावर, का केलं लक्ष्य? काय आहे प्रकरण?

मुंबई, १६ सप्टेंबर २०२३ | कंबलवाला बाबा या नावानं प्रसिद्ध असलेल्या बाबानं घाटकोपरमध्ये हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी या बाबाला घाटकोपरमध्ये आणलं होतं. कंबलवाल्या बाबाला आणून रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी राम कदमांवर कारवाई करा अशी मागणी आता होऊ लागली आहे. कंबलवाला बाबाच्या कथित उपचारांची पद्धत बघा. अंगावर घोंगडं टाकायचं आणि रुग्णाला हातानं तपासायचं. बाबानं एवढं केलं की रुग्ण बरा होतो असा बऱ्याच जणांचा समज आहे आणि त्यात भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांचाही समावेश आहे. राम कदम यांनीच त्याला घाटकोपरमध्ये आणलंय. तब्बल 5 दिवस या बाबानं घाटकोपरमधल्या रुग्णांवर असेच कथित उपचार केले आहेत. घाटकोपरमध्ये हा कंबलवाला बाबा ज्यावेळी रुग्णांवर उपचार करायचा तिथे राम कदमही हजेरी लावायचे. राम कदमांच्या आलिशान गाडीतून कंबलवाल्या बाबाची ये-जा असायची. पण कोण आहे कंबलवाला बाबा? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 16, 2023 08:28 AM