म्हणून विरोधकांनी पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र, रावसाहेब दानवे यांनी नेमकं काय सांगितलं कारण?
VIDEO | विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय पत्र लिहिलं अन् ते लिहिण्याचं कारण काय? रावसाहेब दानवे म्हणाले...
जालना : नऊ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या होत असलेल्या दुरूपयोगाचा उल्लेख केला आहे. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र हे तीन राज्यात भाजप जिंकले म्हणून विरोधक निराश झाले आणि याच निराशेपोटी त्यांनी हे पत्र पंतप्रधान मोदींना पाठवले असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. तर औरंगाबादेत जलील यांच्या आंदोलनात काही आंदोलकांनी थेट औरंगजेबाचा फोटो झळकावला. यावर भाष्य करताना दानवे म्हणाले, औरंगजेबाबद्दल सर्वांनाच माहिती असून एखाद्या कार्यक्रमात त्याचे पोस्टर झळकवने हा देशद्रोह पलीकडचा गुन्हा असून असे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे असेही दानवे यांनी म्हटलंय.