BJP Candidate List : भाजपच्या पहिल्याच यादीत ‘या’ 99 उमेदवारांची वर्णी, बघा कोणाला मिळाली संधी?
BJP Candidate First List : भाजपकडून पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचा पत्ता कट कऱण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भाजपने आज अधिकृतपणे आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ज्यामध्ये तब्बल ९९ उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची नावे समोर आली आहेत. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदरासंघातून तिकीट जाहीर झालं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. बधा कोणा-कोणाला कुठे मिळाली संधी?