BJP Candidate List : भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना पक्षानं उतरवलं निवडणुकीच्या मैदानात

BJP Candidate List : भाजपची तिसरी यादी जाहीर, ‘या’ नेत्यांना पक्षानं उतरवलं निवडणुकीच्या मैदानात

| Updated on: Oct 28, 2024 | 4:13 PM

BJP Candidate 3rd List for Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. बघा यामध्ये कोणा-कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा महायुतीतील भाजप या पक्षाकडून तब्बल 99 उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यात आली होती. यामध्ये देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह चंद्रशेखर बानवकुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तर आता भाजपकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये आणखी 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर कऱण्यात आलेल्या तीन याद्यानुसार आतापर्यंत भाजपने महायुतीमध्ये सर्वाधिक 146 उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या या तिसऱ्या यादीमध्ये मुर्तिजापूर – हरीश पिंपळे, कारंजा -सई डहाके, तिवसा- राजेश वानखडे, मोर्शी- उमेश यावलकर, आर्वी-सुमित वानखेडे, काटोल- चरणसिंग ठाकूर, सावनेर – आशीष देशमुख, नागपूर मध्य – प्रवीण दटके, नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले, नागपूर उत्तर – मिलिंद माने, साकोली – अविनाश ब्राह्मणकर, चंद्रपूर – किशोर जोरगेवार, आर्णी – राजू तोडसाम, उमरखेड – किशन वानखेडे, देगलूर- जितेश अंतापूरकर, डहाणू – विनोद मेढा, वसई – स्नेहा दुबे, बोरीवली – संजय उपाध्याय, वर्सोवा – भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्व – पराग शाह, आष्टी – सुरेश धस, लातूर – अर्चना पाटील, चाकूरकर माळशिरस – राम सातपुते, कराड उत्तर – मनोज घोरपडे आणि पलूस -कडेगाव संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Published on: Oct 28, 2024 04:10 PM