भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट? बघा काय आहे वैशिष्ट्यं?
BJP Candidate 3rd List for Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून बघा यामध्ये कोणा-कोणाला मिळाली संधी? कोणाचा पत्ता झाला कट?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आपल्या उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून आतापर्यंत महायुतीमध्ये सर्वाधिक 146 उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीची काही वैशिष्ट्ये आहेत. ते म्हणजे या तिसऱ्या यादीमध्ये तीन आमदारांचा पत्ता कट करण्यात आलाय तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नागपूर मध्यमधून विद्यमान आमदार विकास कुंभारेंचा पत्ता कट करून प्रविण दटकेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आर्वीच्या दादाराव केचे यांचा पत्ता कट करून सुमित वानखेडेंना तिकीट देण्यात आलंय. यासोबत आर्णीच्या संदीप दुर्वेंचं तिकीट कापलं तर राजू तोडसाम यांना विधानसभेची उमेदवारी दिली. बघा आणखी काय आहेत वैशिष्ट्ये….

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'

पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीजवळ ठोकले पत्रे

बँकांची काम असतील तर आजच करून घ्या, पुढील चार दिवस बँका बंद; कारण...

आधी ऑफर, आता शेकहँड... विधानसभेत एकनाथ शिंदे-नाना पटोलेंची भेट
