उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील विधानसभेच्या निकालानंतर भाजपनं काय लगावला खोचक टोला

उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील विधानसभेच्या निकालानंतर भाजपनं काय लगावला खोचक टोला

| Updated on: Dec 05, 2023 | 3:55 PM

कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका, असे म्हणत भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत किती रडारड करणार? असा खोचक सवालही भाजपने उद्धव ठाकरे यांना केला आहे.

मुंबई, ५ डिसेंबर २०२३ : नुकतेच पाच राज्यातील निकाल समोर आले. यापैकी तीन राज्यात भाजपचा दणदणीत विजय झाला. यानंतर विरोधकांकडून भाजपवर टीका झाली. तर भाजपनं ट्वीट करून उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधलाय. कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका, असे म्हणत भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत किती रडारड करणार? असा खोचक सवालही केलाय. तर ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. तर उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? असा सवाल करत भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती पण आता २२ जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला असल्याचे म्हणत भाजपने निशाणा साधलाय.

Published on: Dec 05, 2023 03:54 PM