शिवसेना-भाजप मधील नाराजी सुरूच? 50 कुठं आणि 105 कुठं? भाजपचे कुठे झळकले पोस्टर

शिवसेना-भाजप मधील नाराजी सुरूच? 50 कुठं आणि 105 कुठं? भाजपचे कुठे झळकले पोस्टर

| Updated on: Jun 16, 2023 | 8:52 AM

VIDEO | शिवसेना-भाजपच्या स्थानिक पदाधिकारी अन् नेत्यांचा राग कायम, शिवसेनेच्या जाहिरातीला भाजपचं बॅनर लावून प्रत्युत्तर

मुंबई : पालघरच्या कार्यक्रमातून शिंदे-फडणवीस यांनी ही दोस्ती तुटायची नाही, असे म्हटलं आहे. पण स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांचा राग काही केल्या कमी झालेला नाही. शिवसेनेच्या जाहिरातीला भाजपने उल्हासनगर आणि मुंबईमध्ये पोस्टर्स लावून प्रत्युत्तर दिलंय. 50 कुठं आणि 105 कुठं? असं म्हणत भाजपने शिवसेनेला प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशा आशयाच्या शिवसेनेच्या जाहिरातीचा राग भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये उमटण्यास सुरूवात झालीये. शिवसेनेच्या या जाहिराला उल्हासनगरमध्ये भाजपकडून बॅनरबाजी करत डिवचण्यात आलंय. 50 कुठं आणि 105 कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा, देवेंद्र फडणवीस साहेब नामही काफी है…बॅनरवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक नेत्यांचेही फोटो दिसताय. तर देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसमोर किंग मेकर असा उल्लेख करण्यात आलाय… बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 16, 2023 08:52 AM