भाजपने हे धंदे बंद करावेत, देवेंद्र फडणवीस यांना सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

भाजपने हे धंदे बंद करावेत, देवेंद्र फडणवीस यांना सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Apr 02, 2023 | 7:58 PM

VIDEO | 'देवेंद्र फडणवीसांना काही गोष्टी कळत नाहीत त्यांचा अभ्यास कमी', सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

संभाजीनगर : महाविकास आघाडीची सभा आज छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या सभेला महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनीही हजेरी लावली. सभास्थळी जात असताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टिव्ही ९ मराठीची संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. संभाजीनगर येथे दोन गटात झालेल्या राड्याच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला त्या म्हणाल्या, संभाजीनगर येथील दंगलीला भाजप जबाबदार आहे. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी अशा दंगली घडवल्या जातात. हे धंदे भाजपने बंद करावे, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला. हे भाजप मान्य करत नसतील तर देवेंद्र फडणवीस यांना काही गोष्टी कळत नाहीत. फडणवीस यांचा अभ्यास कमी पडतो. पकड कमी पडते. सहा सहा खाती एका व्यक्तीकडे कशाला हवेत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Published on: Apr 02, 2023 07:27 PM