Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी पैसा गोळा केला जातोय, संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी पैसा गोळा केला जातोय, संजय राऊतांचा आरोप

| Updated on: Apr 08, 2022 | 12:46 PM

भाजपचे नेते दोन गोष्टीसाठी केंद्रात जातात. खोटे कागद घेऊन केंद्रात जातात. मुंबईला केंद्रशासित करण्याचं त्यांचं फार मोठं षडयंत्रं आहे. त्यांनी केंद्राला एक प्रेझेंटेशन दिलं आहे. मी दाव्यासहीत सांगतो. मुंबईतले काही धनिक, काही भाजपचे नेते, बिल्डर यांच्या संगनमताने हे षडयंत्र सुरू आहे.

मुंबई: भाजपचे (bjp) नेते दोन गोष्टीसाठी केंद्रात जातात. खोटे कागद घेऊन केंद्रात जातात. मुंबईला केंद्रशासित करण्याचं त्यांचं फार मोठं षडयंत्रं आहे. त्यांनी केंद्राला एक प्रेझेंटेशन दिलं आहे. मी दाव्यासहीत सांगतो. मुंबईतले काही धनिक, काही भाजपचे नेते, बिल्डर यांच्या संगनमताने हे षडयंत्र सुरू आहे. त्यांच नेतृत्व किरीट सोमय्या (kirit somaiya) करत आहे. मुंबई केंद्रशासित कशी करता येईल याचं प्रेझेंटेशन याच भाजपच्या पाच लोकांनी तयार केलं. सर्व चोर आणि लफंगे आहेत. त्यांचं नेतृत्व सोमय्यांकडे आहे. काहीही करून त्यांना मराठी माणसाचा अधिकार काढायचा आहे. मुंबई ताब्यात घेण्यासाठी सोमय्या हा लफंगा, चोर, हा महाराष्ट्रद्रोही दिल्लीत जात असतो. मी सांगतो त्याला सबळ पुरावे आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Published on: Apr 08, 2022 12:46 PM