कोल्हापुरात राजे Vs राजे, इतिहासात पहिल्यांदा दोन राजघराणे एकमेकांविरोधात भिडणार?
कोल्हापुरच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन राजघराणे एकमेकांविरोधात भिडणार असल्याची चर्चा होतेय. कोल्हापुरातून मविआकडून छत्रपती शाहू महाराज हे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. संजय मंडलिक यांचा पत्ता कट?
मुंबई, १० मार्च २०२४ : कोल्हापूर लोकसभेत इतिहासात पहिल्यांदाच राजे विरूद्ध राजे असा सामना रंगतना दिसणार असल्याची चिन्ह आहेत. कारण छत्रपती शाहू महाराज यांच्या विरूद्ध भाजप समरजीत घाटगे यांना उतरवण्याची शक्यता आहे. कोल्हापुरच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन राजघराणे एकमेकांविरोधात भिडणार असल्याची चर्चा होतेय. कोल्हापुरातून मविआकडून छत्रपती शाहू महाराज हे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे असली तर विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसकडून पहिल्यांदाच शाहू महाराज हे उमेदवार असण्याची चिन्ह आहे तर या विरोधात भाजप कागलच्या समरजीत घाटगे यांना भाजपचे उमेदवार म्हणून उतरवणार असल्याची चर्चा आहे. काय आहे करवीर आणि कागल घराण्याचा इतिहास… बघा स्पेशल रिपोर्ट…