Nana patole : भाजपनं देश विकायला काढला, नाना पटोलेंची मोदींच्या भाषणावर खरमरीत टीका

Nana patole : भाजपनं देश विकायला काढला, नाना पटोलेंची मोदींच्या भाषणावर खरमरीत टीका

| Updated on: Nov 26, 2021 | 4:07 PM

भाजपनं देश विकायला काढला, भाजप देशाचं खासगीकरण करत आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींच्या भाषणावर केलीय. मोदींनी घराणेशाहीवरून संविधान दिवसाच्या भाषणात जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नाना पटोलेंनी ही टीका केलीय.

भाजपनं देश विकायला काढला, भाजप देशाचं खासगीकरण करत आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींच्या भाषणावर केलीय. मोदींनी घराणेशाहीवरून संविधान दिवसाच्या भाषणात जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नाना पटोलेंनी ही टीका केलीय. मोदी त्यांच्या चुका लपवण्यासाठी काँग्रेसवर टीका करत आहेत. काँग्रेसवर टीका करुनच भाजपवाले मोठे झाले.असा टोलाही नाना पटोलेंनी लगावाय. त्यामुळे मोदींच्या भाषणावर आता काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. परबीर सिंह केंद्रच्या इशाऱ्यावर नाचत होते. त्याना केंद्राचं समर्थन होतं. अशी टीकाही नाना पटोलेंनी केलीय