भाजपने राज ठाकरेंसोबत युती करू नये अन्यथा... कुणी दिला थेट इशारा?

भाजपने राज ठाकरेंसोबत युती करू नये अन्यथा… कुणी दिला थेट इशारा?

| Updated on: Mar 22, 2024 | 5:34 PM

लोकसभा निवडणुका तोंडावर येताच मुंबईत उत्तर भारतीय विकास सेनेने राज ठाकरेंना विरोध करत भाजपच्या अडचणीत वाढ करून नवे समीकरण निर्माण केले आहे. भाजपने राज ठाकरेंना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय विकास सेनेकडून विरोध दर्शवत इशारा देण्यात आलाय.

मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेनेकडून राज ठाकरे यांना विरोध करण्यात आलाय. भाजपने राज ठाकरे यांना सोबत घेऊ नये, असं मत उत्तर भारतीय विकास सेनेकडून व्यक्त करण्यात आलंय. लोकसभा निवडणुका तोंडावर येताच मुंबईत उत्तर भारतीय विकास सेनेने राज ठाकरेंना विरोध करत भाजपच्या अडचणीत वाढ करून नवे समीकरण निर्माण केले आहे. भाजपने राज ठाकरेंना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय विकास सेनेकडून विरोध दर्शवत इशारा देण्यात आलाय. ‘मुंबईतील 6 जागांवर भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करणार आहेत. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला म्हणाले की, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांसाठी जे केले ते कोणीही विसरू शकत नाही. राज ठाकरेंनी कावळ्याला हिंदुत्वाचा झगा धारण करून हंसासारखे चालायला सांगितले. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय हिंदूंनाही मारले. त्यामुळे राज ठाकरे भाजपसोबत आल्यास मुंबईतील उत्तर भारतीय तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 22, 2024 05:34 PM