संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकीसारखं, भाजपच्या 'या' प्रवक्त्याची टीका

संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकीसारखं, भाजपच्या ‘या’ प्रवक्त्याची टीका

| Updated on: Jan 23, 2023 | 12:06 PM

ज्याकडे जातात त्याला संजय राऊत पंतप्रधान म्हणतात...म्हणून संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकीसारखं असल्याची केली या प्रवक्त्याने टीका

खासदार संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकी सारखं आहे. शरद पवारांचा दारात गेले की संजय राऊत म्हणतात देशाचे नेतृत्व पवार साहेब करू शकतात त्यामुळे ते पंतप्रधान. जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांच्याकडे गेले की, ते म्हणतात राहुल गांधी हे पंतप्रधान आणि मध्यंतरी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली होती.

पुढे ते असेही म्हणाले की, नेमकं संजय राऊत यांच्या मनातील पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण आहे. उद्या ते आदित्य ठाकरेंना देखील पंतप्रधान म्हणू शकतील. त्यामुळे संजय राऊत यांनी नेमकं पंतप्रधान कोण? हे अगोदर ठरवावं, दर महिन्याला वेगळी भूमिका मांडू नये, असा सल्ला यावेळी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

Published on: Jan 23, 2023 12:01 PM