काँग्रेसची शाल, राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन उद्धव ठाकरे सभा, भाजप नेत्याचं टीकास्त्र
VIDEO | सांस्कृतिक मंडळावर होणारी महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा अवमान, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी भाजपवर आरोप केले आहे. लोकशाहीचे मुर्दे पाडले जाताय असे अंबादास दानवे यांनी म्हटले तर शहरातील दंगली या सरकार पुरस्कृत असल्याचे संजय राऊत यांनी आरोप केला. या आरोपांना भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांच्या बडबडीला किती महत्त्व द्यायचं? संजय राऊत हे उध्दव ठाकरे यांच्या अर्केस्ट्रा मधलं एक वाद्य आहे. मुख्य वाद्य आज बंद जरी झालं असलं तरी हे वाद्य अद्याप बंद नाही झालं. त्यामुळे त्यांनी दंगली या सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला तो चुकीचा असून संजय राऊत हे राजकारणात उशीला आल्याचा खोचक टोलाही संजय कोनेकर यांनी लगावला आहे. महाविकास अघडीची सभा ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान करणारी सभा आहे. काँग्रेसची शाल आणि राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन उध्दव ठाकरे सभा घेत आहेत, असे म्हणत भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी महाविकास आघाडीच्या सभेवर जोरदार टीका केली आहे.