स्मृती इराणींच्या कार्यक्रमामध्ये मारहाण प्रकरण; चंद्रकांत पाटलांची राष्ट्रवादीवर टीका

| Updated on: May 17, 2022 | 8:53 AM

काल पुण्यामध्ये आयोजित स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. यावरून आता चंद्रकांत पाटलांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

पुण्यामध्ये स्मृती इराणी यांचा कार्यक्रम सुरू असताना काल गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. या कार्यक्रमादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. आता यावरून चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. एखाद्या केंद्रीय  मंत्र्याचा कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमस्थळी गोंधळ घालणे ही संस्कृती भस्मासूर असून, ती महाराष्ट्राला परवडणारी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: May 17, 2022 08:53 AM
स्मृती इराणींच्या कार्यक्रमामध्ये मारहाण प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा घसरला – एकनाथ खडसे