मुस्लिम मतं कुणाला हवीय? भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा कुणावर निशाणा

| Updated on: Feb 24, 2023 | 3:30 PM

VIDEO | पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुस्लिम मतं मिळवण्याच्या मुद्द्यावरून राजकारण रंगलं, काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

योगेश बोरसे, पुणे : पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस अजून या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. दरम्यान आजच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुस्लिमांच्या मतावर भाष्य करत शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत का? शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा एक नेता हिंदू विरोधी भाषण करतो, शरद पवार त्याला थांबवत नाही, हे चुकीचे आहे, पवारांनी भाषण थांबवले पाहिजे होते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 24, 2023 03:30 PM