‘स्वतः ढोंगी असलेल्या माणसाने दुसऱ्याला ढोंगी म्हणू नये’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा कुणावर निशाणा?
VIDEO | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा
पुणे : औरंगाबाद, संभाजीनगर याच्या नामकरणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. केंद्राला कोणताही प्रस्तावर पाठवला नाही भाजपकडून ढोंगीपणा सुरू आहे. तर भाजपला ढोंगी म्हणत राऊतांनी भाजपला डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘स्वतः ढोंगी असलेल्या माणसाने दुसऱ्याला ढोंगी म्हणू नये, याचा ढोंगीपणा उघड झाला आहे. बहुमत नसलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संभाजीनगरचा प्रस्ताव घेतला तेव्हा बहुमत नव्हते. जेव्हा अडीच वर्ष सत्तेत होते. तेव्हा हा प्रस्ताव का नाही घेतला’, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने असे सांगितले की, प्रस्ताव जाईल आणि सरकारकडून ते मंजूरही केले जाईल, असे म्हणत त्यांनी विश्वासही व्यक्त केला.
Published on: Feb 16, 2023 03:02 PM
Latest Videos