'अजूनही मन धजावत नाही...', भाजपच्या बड्या नेत्याकडून बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली

‘अजूनही मन धजावत नाही…’, भाजपच्या बड्या नेत्याकडून बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली

| Updated on: May 30, 2023 | 10:33 AM

VIDEO | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टि्वट करत केल्या भावना व्यक्त, म्हणाले...

नागपूर : चंद्रपुरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या जाण्यानं राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील ट्विट करून बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘चंद्रपूरचे तरुण खासदार आणि माझे जिवलग मित्र बाळू धानोरकर यांच्या अकस्मात निधनाने एक लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक असणारे आणि प्रसंगी त्यासाठी आक्रमक होणारे धानोरकर हे असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते. हा तरुण लोकनेता आता आपल्यात नाही. हे दुःखद वास्तव स्वीकारायला मन अजूनही धजावत नाही. बाळू धानोरकर यांच्या अकाली जाण्याने मी माझ्या कुटुंबातील सदस्य गमावला आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना’ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले.

Published on: May 30, 2023 10:26 AM