नवनीत राणांवर चंद्रकांत पाटील म्हणतात…
शिवसेनेला जनताच पाहून घेईल. सत्तेत आहोत, हे शिवसेना विसरली, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.
पुणे : शिवसेनेला जनताच पाहून घेईल. सत्तेत आहोत, हे शिवसेना विसरली, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. चंद्रकांत पाटील आज आयुक्तांची भेट घेण्यासाठी महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी हनुमान चालिसा, नवनीत राणा या मुद्द्यांवरून शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला. नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल असताना त्यांचा एमआरआय झाला, त्या कक्षातले फोटो समोर आले. यावर शिवसेनेने आक्षेप घेतला. तिथे गोंधळ घातला. तर शिवसेनेच्या या भूमिकेवरून चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र सोडले.
Published on: May 09, 2022 03:39 PM
Latest Videos