कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी होणार? शिंदे गटाच्या नेत्याच्या ‘त्या’ मागणीला भाजपचा पाठिंबा
गजानन कीर्तिकर यांचे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. तर गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे. इतकंच नाहीतर गजानन कीर्तिकर यांचा खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी प्रचारासाठी आणि विकासकामांसाठी वापरला., असे शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी म्हटले तर याला भाजपनेही पाठिंबा दिला.
शिंदे गटाने नेते गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी करा, अशी मागणी शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. अमोल कीर्तीकर हा निष्ठावतं आहे. तो ठाकरे गटासोबत राहिला म्हणून तो शिंदेंसोबत आला नाही, असं वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी आपल्या मुलाबद्दल बोलताना केलं आहे. यानंतर गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी शिशिर शिंदे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. ‘मतदानाच्या दिवशीच गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख केला. इतकंच नाहीतर गजानन कीर्तिकर यांचा खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी प्रचारासाठी आणि विकासकामांसाठी वापरला. अमोल हे गजानन कीर्तिकर यांच्या कार्यालयातून कारभार करत होते, यामुळे ठाकरे गटाला फायदा झाला, असल्याचे शिशिर शिंदे यांनी म्हटले. इतकं च नाहीतर गजानन कीर्तिकर यांचे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. तर गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे’, असेही त्यांनी म्हटले तर याला भाजपनेही पाठिंबा दिला.