अमरावती जिल्हा बंद राहणार? मोदींचा शपथविधी झाल्यानंतर ठाकरे गट आक्रमक; नेमकं कारण काय?
मोदींचा काल शपथविधी सुरू असताना अमरावतीतील राजकमल चौकात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजप कार्यकर्यांनी बळवंत वानखेडेंचे बॅनर फाडले आहेत. दरम्यान, बॅनर फाडल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि.... काय केली ठाकरे गटाने मागणी?
अमरावतीतील बळवंत वानखेडेंच्या लोकसभेतील विजयाचे बॅनर भाजपने फाडले आहेत. मोदींचा काल शपथविधी सुरू असताना अमरावतीतील राजकमल चौकात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजप कार्यकर्यांनी बळवंत वानखेडेंचे बॅनर फाडले आहेत. दरम्यान, बॅनर फाडल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी जर आरोपींना अटक केली नाहीतर अमरावती जिल्हा बंद करणार असल्याचा इशाराही दिली. यासगळ्या प्रकारावर यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मोदींच्या शपथविधीचा जल्लोष साजरा करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित खासदार बळवंत भाऊ वानखडे यांचे पोस्टर फाडले. एक मागासवर्गीय कार्यकर्ता खासदार झाल्यामुळे भाजपच्या संपूर्ण इकोसिस्टिमच्या पोटात दुखू लागलंय. हा उन्माद योग्य नाही, उन्माद दाखवला म्हणून महाराष्ट्रात गाशा गुंडाळावा लागला, जनतेच्या खासदाराला केवळ मागासवर्गीय आहे म्हणून ही वागणूक देणार असाल तर मतपेटीतून आणखी कडक उत्तर दिलं जाईल. तत्पुर्वी अमरावतीमध्ये वारंवार अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत आहे याची दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना पाठीशी घालाल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू !’, असा इशाराही त्यांनी दिला.