BJP Meeting | भाजपच्या राष्ट्रीय कार्यकरिणीची आज बैठक, भाजप नेते ऑनलाईन हजेरी लावणार
देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या 13 राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये संमिश्र कल पाहायला मिळाला होता.
मुंबई : देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या 13 राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये संमिश्र कल पाहायला मिळाला होता. मात्र, पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या हिमाचल प्रदेशात भाजपला धक्कादायक निकालांना सामोरे जावे लागले होते. अन्य राज्यांमध्येही भाजपला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदारांचा बदलता कल लक्षात घेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी कोणती नवी रणनीती आखणार, हे पाहावे लागेल.
Latest Videos