Jayant Patil | मविआ सरकारमधल्या नेत्यांना ईडीच्या माध्यमातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न : जयंत पाटील

Jayant Patil | मविआ सरकारमधल्या नेत्यांना ईडीच्या माध्यमातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न : जयंत पाटील

| Updated on: Aug 30, 2021 | 7:35 PM

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत, भाजपला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला ईडीच्या माध्यमातून अडचणीत आणले जात असल्याचा आरोप केला आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने (ED) धाडी टाकल्यानंतर महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत. राजकीय द्वेषातून धाडी टाकल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी नोटीसची चर्चा सुरु असतानाच आणखी एका शिवसेना नेत्यावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhawana Gawli) यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्वावर बोलताना राष्ट्रवादी नेते आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत, भाजपला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला ईडीच्या माध्यमातून अडचणीत आणले जात असल्याचा आरोप केला आहे.

यावेळी अलमट्टी धरण प्रश्नाबाबतही जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं. कर्नाटक सरकारशी गरज पडल्यास चर्चा करणार असल्याचंही यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं.

Published on: Aug 30, 2021 06:23 PM