‘…आता काँग्रेसचेही काही आमदार भाजपसोबत येणार’; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा, मविआवर टीका
इंडिया आघाडीकडून बैठका सुरू आहेत. याचदरम्यान राज्यात मात्र महाविकास आघाडीत छकलं पडल्याची समोर येत असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठका घेतल्या आहेत. तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटींमुळे त्याचा विपरीत परिणाम मविआवर झाला आहे.
नवी दिल्ली : 15 ऑगस्ट 2023 | भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी काँग्रेससह इंडिया आघाडीकडून मोर्चे बांधनी सुरू आहे. तर इंडिया आघाडीकडून बैठका सुरू आहेत. याचदरम्यान राज्यात मात्र महाविकास आघाडीत छकलं पडल्याची समोर येत असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठका घेतल्या आहेत. तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटींमुळे त्याचा विपरीत परिणाम मविआवर झाला आहे. त्यातून शरद पवार यांनाच आता आघाडीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर आगामी निवडणुकांना ठाकरे गट आणि काँग्रेस समोर जाणार असून तसा बी प्लॅन तयार करण्यात आला आहे. याचदरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर निशाना साधत टीका केली आहे. राणे यांनी इंडिया आघाडीत 36 जण एकत्र येऊन काही फायदा नाही. त्यांच्यामुळे भाजपचं काही बिघडलं नाही. मग येथे तिघे एकत्र येऊ द्या किंवा आणखीन कमी अधिक होऊ द्या काही होऊ शकत नाही. शरद पवार आणि काँग्रेस एकत्र येऊन देखील काही होणार नाही. तर आता आम्ही सर्वपक्षीयांचं सरकार बनवतोय. यात काँग्रेसचेही काही आमदार सोबत येणार आहेत असा दावा राणे यांनी केला आहे.