Breaking | भाजप खासदार तडस यांच्या सूनेला मारहाण, रुपाली चाकणकरांकडून सूनेचा व्हिडीओ ट्विट
वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रडत रडत व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादीकडे मदत मागितली आहे.
वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रडत रडत व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादीकडे मदत मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे त्यांनी मदतीची याचना केली आहे.
तडस कुटुंब मारहाण करत असल्याचा आरोप आहे. सुनेनं बनवलेला व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजाच्या संरक्षणासाठी पोहोचल्या आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी ट्विटद्वारे दिली.
Published on: Sep 08, 2021 10:44 AM
Latest Videos