विधानसभेला भाजप 160 पेक्षा अधिक जागा लढणार? दादा आणि शिंदे गटाला किती मिळणार?

विधानसभेला भाजप 160 पेक्षा अधिक जागा लढणार? दादा आणि शिंदे गटाला किती मिळणार?

| Updated on: Jul 12, 2024 | 11:45 AM

भाजपने १६० ते १७० पेक्षा कमी जागांवर लढू नये, अशी विनंती भाजपच्या राज्यातील नेत्यांनी केंद्रातील नेतृत्वाकडे केल्याचे कळतंय. शिंदेंच्या शिवसेनेकडे ७० जागा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ५८ जागा द्याव्यात असं सुचवण्यात आल्याची माहिती आहे. तर भाजप जास्तीत जास्त जागा लढणार....

महयुतीत भाजपच मोठा भाऊ असल्याने विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात देखील मोठा वाटा असणार आहे. राज्यातील नेत्यांनी केंद्रातील नेतृत्वाकडे १६० पेक्षा अधिक जागांवर लढावं, अशी मागणी केल्याचं कळतंय. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने १६० ते १७० पेक्षा कमी जागांवर लढू नये, अशी विनंती भाजपच्या राज्यातील नेत्यांनी केंद्रातील नेतृत्वाकडे केल्याचे कळतंय. शिंदेंच्या शिवसेनेकडे ७० जागा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ५८ जागा द्याव्यात असं सुचवण्यात आल्याची माहिती आहे. तर भाजप जास्तीत जास्त जागा लढणार आहे, अशी अधिकृत माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. मंत्री भुजबळ यांनी ९० जागांची मागणी केली होती. त्यानंतर जेवढ्या जागा शिंदेंना तेवढ्याच जागा आम्हाला द्या, अशी मागणी केली. तर शिवसेनेच्या रामदास कदमांनी १०० जागांवरून भाजपला जेवढ्या जागा तेवढ्या आम्हाला हव्यात, असा दावा केलाय.

Published on: Jul 12, 2024 11:45 AM