Maharashtra | अमरावती, नांदेड, मालेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रात उद्या भाजपचं धरणे आंदोलन

Maharashtra | अमरावती, नांदेड, मालेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रात उद्या भाजपचं धरणे आंदोलन

| Updated on: Nov 21, 2021 | 6:30 PM

भाजपचे (BJP) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अमरावतीच्या (Amravati) दौऱ्यावर आहेत. अमरावतीत झालेल्या हिंसाचारात (Amravati Violence) जखमी झालेल्यांची फडणवीस भेट घेणार आहेत.

भाजपचे (BJP) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अमरावतीच्या (Amravati) दौऱ्यावर आहेत. अमरावतीत झालेल्या हिंसाचारात (Amravati Violence) जखमी झालेल्यांची फडणवीस भेट घेणार आहेत. तसेच, ते व्यापारी आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे. अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत जाऊन हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते हिंसाचारात दुकानांची तोडफोड झालेल्या परिसरातही जाणार आहेत. तसेच, व्यापाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर ते अमरावती पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी साडे 12 च्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत.

अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यात अनेक वाहनं आणि दुकानांचंही नुकसान झालं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अखेर सहा दिवसानंतर शहरात इंटरनेट सेवा सुरु करण्यात आलीये. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी, वर्क फ्रॉम होम करणारे आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता अमरावती शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, शहरातील संचारबंदी मात्र अद्यापही कायम ठेवण्यात आली आहे.