Special Report | बेळगावात फटाके, महाराष्ट्रात ठिणगी!
ज्या बेळगाव महापालिकेत गेल्या 35 वर्षांपासून मराठी माणसाची सत्ता होती त्या मराठी एकीकरण समितीला यंदा फक्त दोन जागा मिळाल्या. भाजपने ऐतिहासिक विजय मिळवलाय.
ज्या बेळगाव महापालिकेत गेल्या 35 वर्षांपासून मराठी माणसाची सत्ता होती त्या मराठी एकीकरण समितीला यंदा फक्त दोन जागा मिळाल्या. भाजपने ऐतिहासिक विजय मिळवलाय. मात्र, त्या विजयावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बेळगाव महापालिकेत भाजपला विजय मिळाल्याने तिथे फटाके फुटले. त्याच्या ठिणग्या महाराष्ट्रातही उडाल्या. जल्लोषासाठी भाजप समर्थक मोठ्या प्रमाणात जमल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. जल्लोषासाठी लोक बॅरिकेट्स तोडून आत शिरण्याच्या तयारीत होते. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दुसरीकडे शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवात कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी बेळगाव तो झाँकी है मुंबई बाकी आहे, असं म्हणत शिवसेनेला इशारा दिला आहे.
Latest Videos