संभाजीनगर मधील ‘मविआ’च्या ‘वज्रमूठ’सभास्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण, बघा व्हिडीओ
VIDEO | महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाषण केलेल्या सभेच्या मैदानासह व्यासपीठावर शिंपडलं गोमूत्र, बघा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची काल राज्यातील पहिली संयुक्त अशी जाहीर वज्रमूठ सभा झाली. दरम्यान आज महाविकास आघाडीची जिथं सभा झाली तिथं भाजप कार्यकर्त्यांनी गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचे पाहायला मिळाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणांनी हे मैदान पवित्र झालं आहे. परंतु, याच मैदानात उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन सभा घेतली. त्यामुळे हे मैदान अपवित्र झालं आहे. असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन सभा घेतली. याचा भाजपचे पदाधिकारी निषेध करत आहेत. संभाजीनगरमधील जे मैदान त्यांनी पवित्र केले आहे. ज्यांचे अपवित्र पाय येथे लागले आहेत. ते शुद्ध करण्याचं काम आम्ही करत असल्याचं भाजपचे पदाधिकारी यांनी सांगितलं.
Published on: Apr 03, 2023 08:19 PM
Latest Videos