देशात दंगली घडवून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपाचा प्रयत्न, संजय राऊत यांची टीका
देशात जातीय दंगली घडवून सत्तेत येण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. राम मंदिर शस्र आहे तर जातीय दंगली अस्र आहे. 405 चा नारा दंगलीतूनच तयार झाला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाआघाडीशी मजबूत स्थितीत आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. एखाद्या जागेवरुन दावे प्रतिदावे असले तरी त्यातून चर्चेतून मार्ग काढला जाईल असेही राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई | 26 जानेवारी 2024 : देशात राज्य घटनेची अंमलबजावणी करणारी प्रत्येक संस्था गुलाम झाली. या पुढे संविधान वाचविण्याची लढाई सुरु झाली आहे. आमचा विरोध एखाद्या नेत्याला किंवा पक्षाला नाही. सध्या ‘हम करे सो कायदा’ अशी अवस्था आहे.राष्ट्रपती, राजभवन, निवडणूक आयोग या संस्थांनी देशाच्या संविधानाचे रक्षण करायचे असते. परंतू या पदावर बसणाऱ्या व्यक्ती सरपटणाऱ्या झाल्या आहेत अशी टीका शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: जाऊन जरांगे यांच्याशी बोलून चर्चा केली पाहीजे. इतका गोंधळ महाराष्ट्राने कधी पाहीला नव्हता. या राज्यातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढायला हवा. सर्व पक्षीय मंडळाशी चर्चा करुन यावर मार्ग काढायला हवा. भारतीय जनता पक्षाला या देशात दंगली घडवून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच जोरावर त्यांना 405 चा आकडा पार करायचा आहे. महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे. प्रकाश आंबेडकरांशी फोन वरुन बोलणी झाली आहेत. 30 तारखेच्या बैठकीला ते येतील. काही जागांवर आम्ही बसून तोडगा काढू असेही शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.