Nilesh Lanke | ‘त्या’ महिला अधिकारीवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप : निलेश लंके
पारनेरच्या तहसीलदार महिलेने ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी निलेश लंकेवर टीकास्त्र सोडले आहे.
अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केल्याने त्यांनीही आत्महत्येचा इशार दिला आहे. त्यानंतर मात्र भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप ऐकली आणि मन सुन्न झालं, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.
पण आमदार निलेश लंके यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाल, ”संबधिक महिला तहसीलदार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेतय ज्यातून सुटण्यासाठी त्यांनी हा एक केविलवाना प्रयत्न केला आहे.” दरम्यान या ऑ़डीओ क्लिपमुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.