Special Report | ममतांच्या दौऱ्यानंतर राजकीय वादळ, भाजप आणि आघाडीत वार-पलटवार

Special Report | ममतांच्या दौऱ्यानंतर राजकीय वादळ, भाजप आणि आघाडीत वार-पलटवार

| Updated on: Dec 05, 2021 | 10:57 PM

शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींनी काँग्रेसवरच हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी 2024 साठी मोदींविरोधात मजबूत आघाडी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्या आघाडीत त्यांना काँग्रेस नको असाच सूर आहे.

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होत्या. ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल बैठक पार पडली. शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींनी काँग्रेसवरच हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी 2024 साठी मोदींविरोधात मजबूत आघाडी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्या आघाडीत त्यांना काँग्रेस नको असाच सूर आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या त्या टीकेवर मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांचीही खलबतं झाली आणि ममतांनी अहंकारात बोलू नये, असा पलटवार नाना पटोलेंनी केलाय.

दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायचं आहे : फडणवीस

ममता बॅनर्जींच्या टीकेनंतर, फडणवीसांनाही बोलण्याची संधी मिळाली. शरद पवार राज्यात काँग्रेससोबत असल्यानं थेट बोलत नाही. मात्र ममता बॅनर्जी आणि पवारांचं एकच मत आहे. काँग्रेसला बाजूला करुनच आघाडी करण्याची त्यांची रणनीती आहे, असं फडणवीस म्हणाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना भक्कम पर्याय देण्यासाठी ममतांनी पुढाकार घेतलाय. मात्र त्यांना काँग्रेस नकोय.

Published on: Dec 05, 2021 10:56 PM